Sunday, June 24, 2018

उगाच ..... चारोळ्या :-)

                                                     
 तू 


मोगऱ्याचा मंद धुंद वास
कि तुझा श्वास
नक्की काय भुलवून गेलं ?

गुलाबी थंडीतली धूप
कि तुझ्या मिठीतली उब
नक्की काय सुखावून गेलं ?




उंबरठा 

उंबरठ्या बाहेर दोनही पाऊल आली,
आणि माझ्यातलं काहीस मागच्या मागे सुटून गेलं.
काही सोबत तर काही आठवणी उंबऱ्या आतच राहून गेल्या.





--- मीता मेहेर.


ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...