भावना emoji ने व्यक्त होतात आणि पत्र अभ्यासक्रमातच राहील .
मी सिंगापुर ला असताना emails असून सुद्धा मिलिंदला पत्र लिहायचा अट्टाहास केला . तो सुध्दा उत्तर पत्राने द्यायचा . माझ्या वेडेपणात तो जबरदस्तीने ओढला गेला. पण त्या पत्राची वाट बघण्यात काही दिवस निघून जायचे . फोन वर हि बोलायचो , पण पत्राची मजा, आतुरता, त्यातलं अक्षर , सगळं फक्त माझ्या साठी होती ...एकदम exclusive .
आताशा इन्स्टंट messaging ने पटकन कुणाशीही बोलता येत , लिहिता येत ... जग जवळ आलय म्हणतात खर , पण संभाषण हरवलं आहे. ओलावा हरवला . आततायी पणे अर्थाचे अनर्थ ज्यास्त होताना दिसतात.
असो
मी शाळेत असताना माझ्या बहिणी , मैत्रिणी , अनेकाना पत्र लिहिली , त्यांची उत्तर पण यायची . तो खजिना अजून माझ्या कडे आहे. माझा अमूल्य खजिना :-)
माझी मुलगी ई-मेल का होईना लिहिते , तिच्या दूर सात समुद्र पलीकडे बसलेल्या काकाला .
अजून किती काळ लिहिलं माहित नाही . पण मला त्यातही आनंद आहे.
आज हा message पाहिल्यावर उगाच जून गाणं आठवलं
आज हा message पाहिल्यावर उगाच जून गाणं आठवलं
चिठ्ठी आयी है , आयी है , चिठ्ठी आयी है....
--मीता मेहेर
(०९-१०-२०२०)
