१० - १५ वर्षानंतर तो पुन्हा दिसला ,आणि मी थबकले , गोंधळले
आणि त्याच्या खुणा त्याच्यातच शोधत राहिले.
नाव विचारून खात्री करावी असं म्हणत असतानाच त्याच्या कडे मी पाठ फिरवली
पण मन ... मन पार शाळेत जाऊन पोचलं
मंतरलेल वय आणि अल्लड पोरकटपणा
किती ... किती सुंदर होत्या त्या जाणिवा
डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच बघायचं आणि मैत्रिणीनि खदखदत हसायचं
त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलं कि हृदय पार बाहेर येऊन धडकायच
माझ्या मनातली खळबळ , त्याला कधी दिसली असेल का ?
कधी एक क्षण का होईना , त्याने मला फिरून पाहिलं असेल का ?
दिवस गेले , वर्ष सरली , आयुष्य पुढे सरकत राहील ,
आठवणी झाल्या होत्या हद्दपार आणि प्रश्न अजूनही होते अनुत्तरित
------------------------------------------------------------------------------------------------------------
पल दो पल का साथ और कुछ अनकही बातें।
कभी हलकी सी हिचकी और बहोत सारी यादें।
-- मीता मेहेर
११-०१-२०२०