Saturday, July 6, 2024

श्वास

आज एक श्वास थांबला 


एक नजर ....थिजली दूर

आसवांचा पूर , हंबरड्यानं मोकळा झाला उर 


आठवणींचा तूटला बांध 

तूटला हिरवा चूडा , आणि उतरल्या सौभाग्याच्या साऱ्या खुणा 


वर्षानुवर्षं घट्ट धरलेली ओंजळ रितीच राहिली

आयुष्याची गोळाबेरीज राखेत उडून गेली  

उद्या दिवस नियमाने उगवेल , त्यात एक श्वास कायम कमी राहील .


आज ..आज एक श्वास थांबला 


—मीता मेहेर 

(07-07-2024)

Thursday, June 20, 2024

संवाद

 तीचा आणि माझा संवाद , आताशा कमी झालाय .

आधी तिचे शब्द कळायचे,

पण हल्ली अक्षरं सुध्दा पुसट झालीत .


डोळ्यात खुप काही असत.

माझ्या हातावर तिची पकड होत असते घट्ट.

कायम धडपड चालू  असते ,

तिच्या बोलण्याची , माझ्या समजण्याची 


तीचा आणि माझा संवाद, आताशा कमी झालाय 

—-

तीचा आणि माझा संवाद, आताशा कमी झालाय 


तशी ती दिवसभराची कहाणी ,भडाभडा बोलते 

अथ पासून इति पर्यंत , सारं काही सांगते 

तरी कुठेतरी काहीतरी राहून जात 

खोल ...आत बरंच काही साचून  जात 


तीचा आणि माझा संवाद, आताशा कमी झालाय 

-----

एकीच्या बोलण्यातली अक्षर जुळवताना 

दुसरीच्या बोलण्यातल्या भावना जपताना  

सध्या माझ्याकडे बोलायला फार नसत 


माझा माझ्याशी संवाद सुद्धा, आताशा कमी झालाय 


— मीता मेहेर 

(20-06-2024)

Thursday, March 28, 2024

सफर

 दूर दूर तक फैली ,एक सफेद चादर 

और कानोसे गुजराती सर्द हवा , बेरूख , बेपर्वा 


बीच से गुजरता एक रास्ता 

अपनीही मंजिल को धुंडता 


सोचा रास्ते के साथ चल दू 

हो सके तो थोडा आसमान छू लू 

सन्नाटे मे खो कर शायद खुद को पा लू


एक रास्ता जो वादियोंमे खो गया 

दूसरा जो घर की ओर जा रहा 

ठेहर गया मै , थम गयी मै 

दिल और दिमाग के बिच हार गयी मै  


— मीता मेहेर 


ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...