Sunday, July 27, 2025

साथ

 हवा का रुख कुछ बदलासा है 

काले बादल और बिन मौसम बरसात है 


एक गरज और सीने  मै बेचैनी है 

ये कौनसा वक्त है , ये क्या घडी है 


कोई तुफान , या आंधी हो 

बस साथ रेहकर साथ चलने की बात है 

ये तुम्हारे हमारे वजूद की बात है 


-- मीता मेहेर 

(07-05-2025)

operation Sindoor

Saturday, July 26, 2025

पाऊस आणि लिली

दरवर्षी तो येतो ,दरवर्षी ती ही येते. 

तो आधी येतो , आणि नेहमी प्रमाणे ही वेळ घेते. 

तो आधी रिमझिमतो , कधी  रेंगाळतो आणि अगदीच असह्य झाल्यावर धो धो बरसतो. 

तीच गणित ठरलेलं असत. 

ती त्याच असण अजमावते. आणि खात्री पटली की हळूच डोकावते.

मग कळत नकळत तिचा बहर टिपेला पोहोचतो. 

अशी त्यांची भेट. इन मीन दोन दिवसांची. 

पुन्हा पुढल्या वर्षीच्या वचनाची. 

...... दरवर्षी तो येतो ,दरवर्षी ती ही येते. 

 --मीता मेहेर 

(२७-०७-२०२५)



Tuesday, July 8, 2025

देवबाभळी


आज देवबाभळी नाटक पाहिलं. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहावं अशी अप्रतिम कलाकृती. 
ह्या नाटकातल्या प्रत्येक बाजूला आवर्जून दाद द्यावीशी वाटते.  नेपथ्य , ध्वनी , प्रकाशयोजना , संगीत , दिग्दर्शन , लेखन , अभिनय सगळ्यांचीच सांगड इतकी सुंदर घातली आहे कि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहात नाही. 
तीनही कलाकार सुरेल गातात. 

तशी ह्या नाटकात प्रत्यक्ष दोन पात्र आहेत रखुमाई आणि तुकारामाची पत्नी - आवली , पण दोनही कलाकार इतक्या ताकदीने नाटक सादर करतात कि त्यातली बाकीची पात्र विठुराया , तुकाराम महाराज आणि इंद्रायणी नदी , सहजतेने रंगमंच व्यापतात. 

एकीकडे रखुमाई , दैवी स्त्री आणि दुसरीकडे सामान्य आवली. पण शेवटी दोघींच्या भावना समान. बाईच्या मनातल्या  , खासकरून एका बायकोच्या भावना , त्रागा , पीडा , अगतिकता , काळजी , दोहींच्या हि सारख्याच. 

रखुमाईना खुपणारी राधा किंवा जनाबाई किंवा आवळीला खुपणारा विठ्ठल ... खुपणं सारखाच. 

आवली ने विठोबाच्या नावाने खडे फोडले कि रखुमाईला येणारा राग आणि सावकारकीचे कागद इंद्रायणीत सोडून ज्यांना कर्जमुक्त केलं त्यांनीच तुकारामाची निंदा केल्यावर आवली चा राग .. सारखाच 

दोनही बायकांना खुपलेला (देवबाभळीचा ) काटा आणि त्याच दुःख सारखाच. 


-- मीता मेहेर 
०८-०७-२०२५











ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...