आज व्हाट्सअँप वर messages चा पाऊस पडला. त्यातले मोजकेच मनाला भावतात.
नेहमीचाच झालय हे आजकाल ,
fwd , fwd च्या खेळात किती गोष्टी आपण का करतो हेच कळत नाही.
आजच्या दिवशी बाईला वेगळच वलय चढतं.
काय सिलेब्रेट करतो आपण ? स्त्री च अस्तीत्व ? कशासाठी?
समानतेचा उदो उदो करताना , हि partiality हवी कशाला ?
सवय झाली आहे आपल्याला कुणालातरी एका सर्वोच्य स्थानावर नेऊन बसवायची , आणि मग त्यापुढे सगळी ढोंग करायची.
कुठे जातो हा फुकटचा आपलेपणा जेव्हा तिच्या जन्माआधीच तीच जगात येणं मुश्किल झालेलं असत ?
तिच्या असण्यावर , तिच्या दिसण्यावर , सगळ्यावरच , नको असलेले expert कंमेंट्स करून तिला गुदमरून टाकलेलं असत .
बाईच्या जातीला हे शोभत नाहि हे जेव्हा एक बाईचं बोलते तिथेच ह्या so called महिला दिनाची चकाकी निघून जाते
दुसऱ्यांनी डोक्यावर बसवल्यावर अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल्याच्या हर्षोल्लासात , आपण बायकाच हे का विसरतो की महत्व आधी आपण स्वतःच स्वतःला द्यायला हवं आणि त्या साठी कुठल्या एका दिवसाची वाट पाहायची गरज नसते . हा प्रवास रोजचा आहे.
मीता मेहेर
०८-०३-२०१८