This is about my life. How I feel and experience life. How I observe and interpret things. Little something about me :-)
Friday, December 28, 2018
Thursday, September 20, 2018
ती
तुझ्या कुशीत माझं अस्तित्व होत
माझ्या हसण्यात तुझं समाधान होत
दिवसागणिक मी मोठी आणि तुझी मांडी छोटी झाली
बोट हातातून सुटलं आणि हात सहज खांद्यावर आला
तुझी चप्पल , साडी , दागिने सगळंच माझं झालं
तुझं तुझ्यापाशी नक्की काय ग राहील ?
तुझी मूठ सैल आणि माझी पकड आता घट्ट होतेय
तुला सावरण्याचा बळ, मी अजून गोळा करतेय
माझी पावलं शांत पण तुझी रेटल्यागत झालीत
माझी सावली आता मोठी आणि तुझी धूसर झालीय
--मीता मेहेर
२०-०९-२०१८

Saturday, August 11, 2018
बचपन...
वो छोटी छोटी बातेँ और बडीसी मुस्कुराहटें
भूले नहीं भूलती वो बचपन की यादें
वो बारिश में भीगना और माँ का डाँटना
ढेरसारी आ...छी (छींके), और रात भर जागना
हल्कीसी ख़रोंच और दुनियाभरका ड्रामा
माँ की झप्पी और चॉकलेट का बहाना
गर्मी की छुट्टियाँ और दोपहर का शोर
बड़ो की नींद से हमें क्या सरोकार
गाँव में खुले छत पे बिताई हर वो रात
चमेली की खुशबू और समंदर का साथ
छतो पे खूब जमता लुकाछुपी का खेल
जमा किये चंद सिक्के और थोड़ी सुखी भेल
दिवाली में सुखाये हुए कुछ तेरे कुछ मेरे पटाखें
चुराकर जो जलाये वही जोरसे फुंटे
वो मिटटीके खिलौने और लकड़ी का झूला
हर सावन न जाने ले गया मेरी कितनी कागज की कश्तियाँ
वो छोटी छोटी बातेँ और बडीसी मुस्कुराहटें
भूले नहीं भूलती वो बचपन की यादें
-- मीता मेहेर
(११-०८-२०१८ )
Wednesday, July 11, 2018
पाऊस

पाऊस तुझा माझा,
तुझ्या माझ्या सारखा.
कधी खिडकीत आगंतुकासारखा डोकावणारा,
तर कधी बेधडक अंगभर भिजवून , अंतरंगात डोकावणारा.
कधी बरसणारा , कधी कोसळणारा,
कधी तुझ्याच सारखा झाकोळून टाकणारा.
कधी उगाच मळभ , हुंदका आणि आवंढा,
कधी खळाळता , झोकून देणारा झरा.
कधी अळवावरच पाणी ...सुंदर पण अलिप्त ,
तर कधी झिरपून एकजीव झालेला मृदगंध.
पाऊस तुझा माझा,
तुझ्या माझ्या सारखा.
--मीता मेहेर
०७-०७-२०१८
Sunday, June 24, 2018
Thursday, March 8, 2018
जागतिक महिला दिन
आज व्हाट्सअँप वर messages चा पाऊस पडला. त्यातले मोजकेच मनाला भावतात.
नेहमीचाच झालय हे आजकाल ,
fwd , fwd च्या खेळात किती गोष्टी आपण का करतो हेच कळत नाही.
आजच्या दिवशी बाईला वेगळच वलय चढतं.
काय सिलेब्रेट करतो आपण ? स्त्री च अस्तीत्व ? कशासाठी?
समानतेचा उदो उदो करताना , हि partiality हवी कशाला ?
सवय झाली आहे आपल्याला कुणालातरी एका सर्वोच्य स्थानावर नेऊन बसवायची , आणि मग त्यापुढे सगळी ढोंग करायची.
कुठे जातो हा फुकटचा आपलेपणा जेव्हा तिच्या जन्माआधीच तीच जगात येणं मुश्किल झालेलं असत ?
तिच्या असण्यावर , तिच्या दिसण्यावर , सगळ्यावरच , नको असलेले expert कंमेंट्स करून तिला गुदमरून टाकलेलं असत .
बाईच्या जातीला हे शोभत नाहि हे जेव्हा एक बाईचं बोलते तिथेच ह्या so called महिला दिनाची चकाकी निघून जाते
दुसऱ्यांनी डोक्यावर बसवल्यावर अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल्याच्या हर्षोल्लासात , आपण बायकाच हे का विसरतो की महत्व आधी आपण स्वतःच स्वतःला द्यायला हवं आणि त्या साठी कुठल्या एका दिवसाची वाट पाहायची गरज नसते . हा प्रवास रोजचा आहे.
मीता मेहेर
०८-०३-२०१८
Friday, February 23, 2018
वार्धक्य
वार्धक्य म्हणतय, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस,
थांब तुला खातो
म्हातारी म्हणते , थांब रे , रहाटगाडग्याला जुंपून घेतलं इतकी वर्ष
आता थोड़ तर जगू दे मनासारखं
आता कुठे वेळ मिळाला तर तू समोर उभा
हातापायातील बळ गेलं ,उसनं अवसान आणू कुठून आता ?
बालपणी ज्यांना हात धरुन चालावलं , त्यांचा हात आता शोधावा लागतो
लक्ख उजेडातही धडपडायला होत
तो वेग ती उमेद देव जाणे कुठे हरवली
शरीरा बरोबर मनानेही मान टाकली
तुझं येणं अटळ होत पण
सहन होत नाही रे बाबा तुझं दिवसागणिक असं थोडं थोडं खाण
काल मात्र खळखळून हसले, सख्यां बरोबर जुन्या आठवणीत रमले
सगळे गोड क्षण ,पुन्हा एकदा जगले
क्षणिक का होईना तुला विसरले
-- मीता मेहेर
(२२-०२-२०१८)

Sunday, February 11, 2018
चला मातीत खेळूया !!!!
चिमुकल्या हाती दिली मऊ मऊ माती ,
अन ती बिचारी अनोळखी स्पर्श झाल्यागत बावरली .
गमतीच्या चार गोष्टी सांगितल्या पाचारणे गुरुजींनी ,
आणि मग मात्र कमालाच केली पाचवीच्या मुलांनी .
छान ताजी भाजी दिली सगळ्यांच्या हातात ,
अन ह्याच काय करावं, ह्या विचारात मुलं हसली गालात.

शंका कुशंका पडल्या बाजूला ,
आणि बघता बघता मातीचा मळा लागला फुलायला .
पाटील गुरुजींचा गणेशा घेत होता मूर्त रूप ,
मुलांनीही बनवले आपापले बाप्पा खूप .
गमतीचा तास त्या दिवशी जरा जास्तच लांबला ,
पण हसू आणि समाधानानं भरला आमचा गल्ला.
--- मीता मेहेर
(०८-०२-२०१८)

Subscribe to:
Posts (Atom)
ती
ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...
-
वर्ष कशी सरली ? आत्ता आत्ताच तर तुझा हात सोडून मी पुढेपुढे पळत होतो , अडखळलो , ठेचाळलो , थोडं दूर जाऊन तू पाठी आहेस ना ..ह्याची खात्री कर...
-
ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...
-
आज देवबाभळी नाटक पाहिलं. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहावं अशी अप्रतिम कलाकृती. ह्या नाटकातल्या प्रत्येक बाजूला आवर्जून दाद द्यावीशी वा...