Friday, February 23, 2018

वार्धक्य

वार्धक्य म्हणतय, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस,
थांब तुला खातो

म्हातारी म्हणते , थांब रे , रहाटगाडग्याला जुंपून घेतलं इतकी वर्ष
आता थोड़ तर जगू दे मनासारखं

आता कुठे वेळ मिळाला तर तू समोर उभा
हातापायातील बळ गेलं ,उसनं अवसान आणू कुठून आता ?

बालपणी ज्यांना हात धरुन चालावलं , त्यांचा हात आता शोधावा लागतो
लक्ख उजेडातही धडपडायला होत

तो वेग ती उमेद देव जाणे कुठे हरवली
शरीरा बरोबर मनानेही मान टाकली

तुझं येणं अटळ होत पण
सहन होत नाही रे बाबा तुझं दिवसागणिक असं थोडं थोडं खाण

काल मात्र खळखळून हसले,  सख्यां बरोबर जुन्या आठवणीत रमले
सगळे गोड क्षण ,पुन्हा एकदा जगले
क्षणिक का होईना तुला विसरले

-- मीता मेहेर
(२२-०२-२०१८)






Sunday, February 11, 2018

चला मातीत खेळूया !!!!

चिमुकल्या हाती दिली मऊ मऊ माती ,
अन ती बिचारी अनोळखी स्पर्श झाल्यागत बावरली .
गमतीच्या चार गोष्टी सांगितल्या पाचारणे गुरुजींनी ,
आणि मग मात्र कमालाच केली पाचवीच्या मुलांनी .

छान ताजी भाजी दिली सगळ्यांच्या हातात ,
अन ह्याच काय करावं, ह्या विचारात मुलं हसली गालात.





शंका कुशंका पडल्या बाजूला ,
आणि बघता बघता मातीचा मळा लागला फुलायला .

पाटील गुरुजींचा गणेशा घेत होता मूर्त रूप ,
मुलांनीही बनवले आपापले बाप्पा खूप .


गमतीचा तास त्या दिवशी जरा जास्तच लांबला ,
पण हसू आणि समाधानानं भरला आमचा गल्ला.

--- मीता मेहेर
(०८-०२-२०१८)






ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...