Wednesday, July 11, 2018

पाऊस


पाऊस तुझा माझा,
तुझ्या माझ्या सारखा.

कधी खिडकीत आगंतुकासारखा डोकावणारा,
तर कधी बेधडक अंगभर भिजवून , अंतरंगात डोकावणारा.

कधी बरसणारा , कधी कोसळणारा,
कधी तुझ्याच सारखा झाकोळून टाकणारा.

कधी उगाच मळभ , हुंदका आणि आवंढा,
कधी खळाळता , झोकून देणारा झरा.

कधी अळवावरच पाणी ...सुंदर पण अलिप्त ,
तर कधी झिरपून एकजीव झालेला मृदगंध.

पाऊस तुझा माझा,
तुझ्या माझ्या सारखा.

--मीता मेहेर
०७-०७-२०१८


ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...