Tuesday, August 22, 2017

आठवण II



मनाचे कोनाडे साफ करताना
अचानक चुरगळलेला कागद समोर आला

उघडून बघितल्यावर , आठवणींचा flashback सुरु झाला .
ते वहीतलं दुसरं तिसरं पण असेल .
कोऱ्या वहीचा तो वास , अचानक श्वासात भरून आला.

कागदावरची लिखावट पुसत झाली होती .
पण संदर्भ अजूनही ठळक होता .

रटाळवाण्या lecture मध्ये , सर्वांची नजर चुकवून ,
कुणाकडे टक लावून पाहत होते, ते आठवलं..

नजर मिळाल्यावरच हसू , ना तेव्हा लपवू शकले ना आत्ता .
आणि हसण्याचं कारण ना तेव्हा देऊ शकले ना आत्ता .

-- मीता मेहेर.
    (२०१३)



आठवण I



मनाचे कोनाडे साफ करताना
अचानक चुरगळलेला कागद समोर आला

उघडून बघितल्यावर , आठवणींचा flashback सुरु झाला .
ते वहीतलं दुसरं तिसरं पण असेल .
कोऱ्या वहीचा तो वास , अचानक श्वासात भरून आला.

कागदावरची लिखावट पुसत झाली होती .
सुरवातीचं सुबक अक्षर , शेवटी शेवटी फरफटत गेलं ....

एक race  चालू होती , आणि मी धावत होते .
थांबून श्वास घायचाच विसरले .

आजूबाजूचं सामावून घेता घेता ,
स्वतःच अस्तिव विसरले .


-- मीता मेहेर
    (२०१३)

एक प्रवास ... रोज नवा


तीच मी अन तीच सकाळ ,
पुन्हा पुन्हा जगते मी ,
आयुष्याचे नवनवीन अर्थ शोधते मी.

कधी प्रश्न , कधी उत्तर , कधी निरव शांतता,
वादळात भरकटूनही , परत उभी राहते मी.

ओळखीच्याच वाटेवर कितीदा हरवते ,
अन प्रत्येक वेळेस माझीच मला उलगडत जाते मी .

तीच मी आणि तीच सकाळ ,
पुन्हा नव्याने जगते मी .
आयुष्याचे नवनवीन अर्थ शोधते मी.


मीता मेहेर
(२२-०८-२०१७)





Saturday, August 5, 2017

८०१ ते ५०५ चा प्रवास


२००३ मध्ये मिलिंद मेहेरेनी हिम्मत दाखवली आणि स्वतःच घर घेण्यासाठी मोट्ठी उडी मारली. मुंबईतलं स्वतःच घर हे तेव्हाही मध्यम वर्गीयांसाठीं मोठी गोष्ट होती आणि आजही आहे .

मिलिंदला खूप सल्ले मिळाले , पण काही बाबतीत साहेब खरंच कुणाच्याही बापाचं ऐकत नाही.  घर घेतलं .
लग्ना आधी घराचे हफ्ते भरल्यानंतर , मिलिंदकडे काही शंभर उरत असावेत.  माझ्या पगाराचा तसाही फायदा होण्यासारखाच नव्हता. नशीब लग्नाआधी मला बऱ्यापैकी नोकरी मिळाली आणि त्याच ओझं मला थोडं कमी करता आलं.

लग्न होउन घरी आले, नव्याची नवलाई संपली, आणि संसार खऱ्या अर्थाने सुरु झाला . आई नेहमी म्हणायची , तुझं लग्न झालं कि तुला " आटे दाल का भाव " कळेल . ते खरं होत .

दोघांचे तीन झालो , दुचाकी बरोबर चार चाकी आली .. पगार वाढला, खर्च वाढले, चिंता सुद्धा वाढल्या. पण ह्या घरात सगळं निभावून गेलं.
मी स्वप्नाळू , मिलिंद प्रॅक्टिकल... पण आयुष्य छान जगलो .... जगतोय.

ह्या घराने मला स्थिरता दिली , स्वातंत्र्य दिल, समानता दिली . जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे , पण परत यायची ओढ दिली , उब दिली .

४ भिंतीचं  , अगदी सुरु होऊन संपणार माझं घर, आता थोडं मोठं दिसेल...
         
मोठं घर घेतोय . आमचं घर आता दुसऱ्याचं झालं. आमच्याच घरात काही महिने भाडेकरु म्हणून राहायचं आहे.
३ महिन्यानंतर नवीन घरात जाऊ . पण हुरहूर अगदी तशीच आहे १४ वर्षांपूर्वीची . त्या घरात पहिलं पाऊल टाकताना नवीन घर मला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाईल का ?

नवीन घर , ह्या घरासारखं मला आपलं वाटेल का ? आपलं करेल का?

-- मीता मेहेर.
२३-०६-२०१७


Friday, June 23, 2017

घर


चार भिंतींच , अगदी सुरु होऊन संपलेलं ,
पण तरीही आठवणींनी भरलेलं .

घरात टाकलेलं पाहिलं पाऊल , पहिला दिवाळ सण ,
मनात साठवलेत असे कितीतरी क्षण .

नवी सुरुवात , नवी स्वप्न , नव्याने केलेली आपली धडपड .
कधी हसु कधी आसू , कधी चिमुकलीची दुडदुड .

सगळ्यातच होत सोबत, आपलं छोटस घर.
आपल्या सुखदुःखाचा त्यानेही जगाला प्रत्येक कण

कधी आपण घराला सजवलं , कधी त्याने आपल्याला सावरलं. 
चार भिंतींच , अगदी सुरु होऊन संपलेलं ,
आपलं घर

-- मीता मेहेर
(२४-०६-२०१७)



Thursday, June 22, 2017

परीक्षा


परीक्षा  झाली सुरु ,
अभ्यास करा म्हणतात गुरु .
अभ्यास करून डोकं लागत दुखू
मग आईला विचारू हळूच
आता थोडस खेळू ?

आईचा धपाटा लागतो सणकून
खेळायचे विचार जातात विरून
गणिताचे वर्ग , कविता , शब्द ... पाठ करून करून
मानच जाते मोडून
मग आईला विचारू हळूच
आता थोडस खेळू ?




दिवस संपतो दहा वाजता , उठणे आहेच सहा वाजता
दुपारी मात्र थोडास झोपून
मग आईला विचारू हळूच
आता थोडस खेळू ?

-- मीता तांडेल
(३०.०३.१९९०) 

Friday, May 12, 2017

पाऊस

                                                                               






तू आलास आणि बरसून गेलास ,
अगदी आजच्या पावसासारखा .
नखशिखान्त रंगवून  गेलास .....आपल्याच रंगात .

तू गेल्यावर तुझ्या खुणा शोधतेय ,
मातीच्या धुंद गंधात ,
भरून घेतलेल्या श्वासात .

तू आलास आणि बरसून गेलास ,
अगदी आजच्या पावसासारखा .

 -- मीता मेहेर .
 (०४.०३.२०१६)

Saturday, April 29, 2017

Fill in the blanks .....



Fill in the blanks सारखं आयुष्य कधी कधी रिक्त वाटत .
शब्दांच्या गर्दीत अशब्द नि:शब्द होत जात.

असह्य होणारी एक पोकळी निर्माण होते
आणि तिला भरून काढण्यासाठी , मन धावत राहत
एकाकी .... दिशाहीन .....

धाप लागली कि वाटत आता बस्स ...
इथेच थांबावं .
जसं आहे तसं , आयुष्य जगावं .

किती राहील , किती गेलं ,
हे पाहण्यासाठी उघडलेली ओंजळी
रितीच भासते

परत एका Fill in the blanks सारखी .

-- मीता मेहेर .
(२४-०७-१९९९ )


   

आयुष्य



आयुष्य सुंदर असत , ते तस जगता आलं पाहिजे .
आयुष्यातला प्रत्येक क्षण , उपभोगता आला पाहिजे.

आयुष्य सुंदर करायला डोळ्यात आशा हवी ,
अन ते सुंदर दिसायला , वेगळीच नशा हवी .

आयुष्याचे सगळे रंग समजायला हवेत.
गडद वा फिके असो , त्यात रंगायला हव.

आयुष्य फक्त स्वतःच्या अटींवर जगू नये .
थोडं बोलावं , थोडं ऐकावं.
आयुष्यच गाणं एकत्र गुणगुणावं

आयुष्य सुंदर असत , ते तस जगात आलं पाहिजे .
आयुष्यातला प्रत्येक क्षण , उपभोगता आला पाहिजे.

-- मीता मेहेर
(१८-१२-२०००)




Sunday, March 19, 2017

नातं

 

कधी कधी नातं नात्यांत गुंतून जातं , अन त्याचा अर्थच बदलून जातो .
मग त्यांना आपण वेगवेगळी नाव शोधतो.

पण काही नाती अशीच राहतात ... एखाद्या अनामिकेसारखी .
ओळख नसून सुध्दा वेगळी .

काही नाती मैत्रीच्या नावाखाली खपून जातात.
तर काही भावना मात्र असतात.

आयुष्यात कित्येक नाती जुळतात , कित्येक तुटतात .
काही लादली जातात , काही आपसूक बनतात .

ह्या नात्यांचा अजब खेळ असतो .
जेव्हा वाटत जिंकलो , तेव्हाच सारं संपलेलं असत .

-- मीता मेहेर .
   (२३.०५. १९९८)

Friday, March 10, 2017

तू


तुझी पाउल वाळूत रूतलेली ,
अन मी परत सप्तपदी घेतली

तुझा हात अगदी तसाच आहे हातात ,
...... घट्ट ..... आश्वस्थ .

तू आयुष्याला अर्थ दिलास असं नाही ,
पण रंग दिलेस भरपूर .

 -- मीता मेहेर .
 (०७.०२.२०१६) 

Monday, March 6, 2017

खिडकी





आतून बाहेर झाकायला देणारी .
मनाची कवाड उघडणारी.
कधी छोटी कधी मोठी , बाहेरच जग तसाच ठेऊन ,
आपल्याला वेगळीच नजर देणारी .







कधी तिच्या कोनाड्यात जळमट बसतात .
समोरच धूसर करून जातात.
कधी इतकी घट्ट बसून जाते कि ,
उघडता म्हणून उघडत नाही
 पण कधी अगदीच खुश असते
पावसाचं पाणी अलगद गालांवर उडवते
इंद्रधनुष्य मनमुराद पाहू देते
आतून बाहेर पाहायला शिकवते

-- मीता मेहेर
(०७.०३.२०१७)

Monday, January 23, 2017

Cycling and accident

​Today (05/03/2016) i completed 16.5 km by cycle my longest distance so far and met with my first ever accident... So here is the story :-)

Milind and i started with our usual loop from Dheeraj upavan to bridge just b before Dahisar toll and back till kulraj broadway and from there to thakur village and back.

But as i had too many breaks in between i asked for another loop in thakur village from the inside road of Dattani .. I was happy as there was very less traffic as road work in progress ..also Saw priya bapat twice😀. and one more artist from movie Yellow.

All was well till i approached road of all banks i.e yes bank and canara etc.. There was a small gap between the road and cement slab. I was cycling with normal speed , thinking about if i can manage the gap and get on to cement road and i was wrong... Cycle stuck between the gap and i sledded over the road for at least 2 feet , flat on my chest. The first contact of my chin to the ground somehow warned me to keep my face up. I stood up . Took deep breaths and realised how hard i fell on my chest.
Meanwhile Milind came back to check on me and there was another gentleman holding my cycle . Pain was bearable but still that guy calling me Aunty.... hurt the most 😀.

I sat down on the stairs near bank ATM and i could experience the phrase , "dolya samor kajave disane" something of that sort.. Eveything in front of me was like overexposed photo ... All white with few objects with border. I guess we waited there for atleast 5/10 mins .. Then i was better. I could feel pain near chin and lip area ..But thankfully with only little swelling. Few scratches on left side of palm.
Milind asked me if i could walk , cycle and i decided to cycle back home with turtle speed.

First thing i asked him as we reached home is how may KM we did and and 16.5 km brought smile to my face😀.

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...