ती गेली ...
कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली.
माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले .
माझ्या हातावरची तिची पकड सुटली .
आज नाळ तुटली .
नातेवाईक , मित्रमैत्रिणीनी केले आठवणींचे उजाळे .
अगणित न माहीत असलेल्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा जगले .
ती गेली ...
आता मागे राहिली एक असह्य पोकळी आणि
तिच्याशिवाय उरलेली मी
मीता मेहेर
१७-११-२०२५
.jpeg)


