Tuesday, August 22, 2017

आठवण II



मनाचे कोनाडे साफ करताना
अचानक चुरगळलेला कागद समोर आला

उघडून बघितल्यावर , आठवणींचा flashback सुरु झाला .
ते वहीतलं दुसरं तिसरं पण असेल .
कोऱ्या वहीचा तो वास , अचानक श्वासात भरून आला.

कागदावरची लिखावट पुसत झाली होती .
पण संदर्भ अजूनही ठळक होता .

रटाळवाण्या lecture मध्ये , सर्वांची नजर चुकवून ,
कुणाकडे टक लावून पाहत होते, ते आठवलं..

नजर मिळाल्यावरच हसू , ना तेव्हा लपवू शकले ना आत्ता .
आणि हसण्याचं कारण ना तेव्हा देऊ शकले ना आत्ता .

-- मीता मेहेर.
    (२०१३)



आठवण I



मनाचे कोनाडे साफ करताना
अचानक चुरगळलेला कागद समोर आला

उघडून बघितल्यावर , आठवणींचा flashback सुरु झाला .
ते वहीतलं दुसरं तिसरं पण असेल .
कोऱ्या वहीचा तो वास , अचानक श्वासात भरून आला.

कागदावरची लिखावट पुसत झाली होती .
सुरवातीचं सुबक अक्षर , शेवटी शेवटी फरफटत गेलं ....

एक race  चालू होती , आणि मी धावत होते .
थांबून श्वास घायचाच विसरले .

आजूबाजूचं सामावून घेता घेता ,
स्वतःच अस्तिव विसरले .


-- मीता मेहेर
    (२०१३)

एक प्रवास ... रोज नवा


तीच मी अन तीच सकाळ ,
पुन्हा पुन्हा जगते मी ,
आयुष्याचे नवनवीन अर्थ शोधते मी.

कधी प्रश्न , कधी उत्तर , कधी निरव शांतता,
वादळात भरकटूनही , परत उभी राहते मी.

ओळखीच्याच वाटेवर कितीदा हरवते ,
अन प्रत्येक वेळेस माझीच मला उलगडत जाते मी .

तीच मी आणि तीच सकाळ ,
पुन्हा नव्याने जगते मी .
आयुष्याचे नवनवीन अर्थ शोधते मी.


मीता मेहेर
(२२-०८-२०१७)





Saturday, August 5, 2017

८०१ ते ५०५ चा प्रवास


२००३ मध्ये मिलिंद मेहेरेनी हिम्मत दाखवली आणि स्वतःच घर घेण्यासाठी मोट्ठी उडी मारली. मुंबईतलं स्वतःच घर हे तेव्हाही मध्यम वर्गीयांसाठीं मोठी गोष्ट होती आणि आजही आहे .

मिलिंदला खूप सल्ले मिळाले , पण काही बाबतीत साहेब खरंच कुणाच्याही बापाचं ऐकत नाही.  घर घेतलं .
लग्ना आधी घराचे हफ्ते भरल्यानंतर , मिलिंदकडे काही शंभर उरत असावेत.  माझ्या पगाराचा तसाही फायदा होण्यासारखाच नव्हता. नशीब लग्नाआधी मला बऱ्यापैकी नोकरी मिळाली आणि त्याच ओझं मला थोडं कमी करता आलं.

लग्न होउन घरी आले, नव्याची नवलाई संपली, आणि संसार खऱ्या अर्थाने सुरु झाला . आई नेहमी म्हणायची , तुझं लग्न झालं कि तुला " आटे दाल का भाव " कळेल . ते खरं होत .

दोघांचे तीन झालो , दुचाकी बरोबर चार चाकी आली .. पगार वाढला, खर्च वाढले, चिंता सुद्धा वाढल्या. पण ह्या घरात सगळं निभावून गेलं.
मी स्वप्नाळू , मिलिंद प्रॅक्टिकल... पण आयुष्य छान जगलो .... जगतोय.

ह्या घराने मला स्थिरता दिली , स्वातंत्र्य दिल, समानता दिली . जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे , पण परत यायची ओढ दिली , उब दिली .

४ भिंतीचं  , अगदी सुरु होऊन संपणार माझं घर, आता थोडं मोठं दिसेल...
         
मोठं घर घेतोय . आमचं घर आता दुसऱ्याचं झालं. आमच्याच घरात काही महिने भाडेकरु म्हणून राहायचं आहे.
३ महिन्यानंतर नवीन घरात जाऊ . पण हुरहूर अगदी तशीच आहे १४ वर्षांपूर्वीची . त्या घरात पहिलं पाऊल टाकताना नवीन घर मला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाईल का ?

नवीन घर , ह्या घरासारखं मला आपलं वाटेल का ? आपलं करेल का?

-- मीता मेहेर.
२३-०६-२०१७


ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...