Friday, October 9, 2020

पत्र


आज मित्राचा व्हाट्सअँप  message पहिला . आणि मी विचार करत राहिले कि शेवटचं पत्र कधी आणि कुणाला पाठवलं होत. अजूनही आठवत नाही .  पत्र राहूदे , पर्सनल ई-मेल सुद्धा केलं नाही कित्येक वर्षात. 

भावना emoji ने व्यक्त होतात आणि पत्र अभ्यासक्रमातच राहील . 

मी सिंगापुर ला असताना emails असून सुद्धा मिलिंदला पत्र लिहायचा अट्टाहास केला . तो सुध्दा उत्तर पत्राने द्यायचा . माझ्या वेडेपणात तो जबरदस्तीने ओढला गेला. पण त्या पत्राची वाट बघण्यात काही दिवस निघून जायचे . फोन वर हि बोलायचो , पण पत्राची मजा, आतुरता, त्यातलं अक्षर , सगळं फक्त माझ्या साठी होती ...एकदम exclusive . 

आताशा इन्स्टंट messaging ने पटकन कुणाशीही बोलता येत , लिहिता येत ... जग जवळ आलय म्हणतात खर , पण संभाषण हरवलं आहे. ओलावा हरवला . आततायी पणे अर्थाचे अनर्थ ज्यास्त होताना दिसतात. 

असो 

मी शाळेत असताना माझ्या बहिणी , मैत्रिणी , अनेकाना पत्र लिहिली , त्यांची उत्तर पण यायची . तो खजिना अजून माझ्या कडे आहे. माझा अमूल्य खजिना :-)  

माझी मुलगी ई-मेल का होईना लिहिते , तिच्या दूर सात समुद्र पलीकडे बसलेल्या काकाला .
अजून किती काळ लिहिलं माहित नाही . पण मला त्यातही आनंद आहे. 

आज हा message पाहिल्यावर उगाच जून गाणं आठवलं 

चिठ्ठी आयी है , आयी है , चिठ्ठी आयी है.... 

--मीता मेहेर 
(०९-१०-२०२०)


Sunday, August 2, 2020

मैत्री

कधी भेटलो , आणि कसे भेटलो ?

असे संदर्भ अंधुक झाले , तरी बोलण्यासारखं भरपूर असलं .

की  मैत्री जुनी म्हणायची 






अचानक फोन आल्यावर , चकार शब्द बोलता ,

शांतपणे फक्त ऐकून , आश्वासक हुंकार आले 

की  मैत्री जुनी म्हणायची 




स्त्रीलिंगीपुलिंगी च्या भानगडीत पडता,

 

हो ला हो  आणि अरे ला का रे करणारं कुणी असलं ,

की  मैत्री जुनी म्हणायची




 

आपापल्या जगात गुरफ़टलेलं असताना 

 

शेवटचं बोलणं कधी झालं , हे विसरलं  ,

 

तरी महत्वाच्या क्षणी , पटकन नाव सरकून गेलं, 

 

की  मैत्री जुनी म्हणायची  





--मीता मेहेर 
(02-08-2020)

Sunday, May 24, 2020

अधुरा...

आधी खुली खिडकीसे दिखता आसमाँ अधुरासा 
और मेरे हिस्से का सूरज भी था आधा
कैसे दिन है .. जहाँ रोज का  जीना लगे अधुरासा 

एक जान है जो घर में अटकती है 

दूसरी जो रास्ते रास्ते भटकती है 
और कुछ का साथ, सांसे छोड़ जाती है  

कुछ तो हो जो बांधे रखे 

एक उम्मीद .. एक ख्वाब 
के फिर से वो आसमान हो मेरा
और वो सूरज भी हो पूरा

--मीता मेहेर 

(२४-०५-२०२०)








Wednesday, April 22, 2020

यू ही...

                                          
आज यूही आँख भर आयी। 
आधी अधूरी साँस ..... अटक गयी। 
कोशिश की .... बस्स एक आह सी निकली। 
ये ख़ामोशी मुझे निगल गयी। 



-- मीता मेहेर 
२२-०४-२०२० 

  

Saturday, March 28, 2020

जातील ...हे ही दिवस जातील

आज खिडकीवर कावळा ओरडला
मी हसले,
कोण येणार माझ्याकडे ?

      काल परावा पर्यंत ओसंडून वाहणारे रस्ते झालेत ओसाड
     आणि गल्लीत निरव शांतता .
     सगळे आवाज स्पष्ट ऐकू येतात आताशा
     आतले .... बाहेरचे

      कैद झालोय स्वतःच्याच घरात ,
      सुखाची बदलली व्याख्या  
      गरजा झाल्यात कमी आणि 
      प्रखर झाल्यात जाणीवा

जातील हे ही दिवस जातील
परत ओरडेल कावळा खिडकीवर
आणि मी .. मी पुन्हा हसेन.

-- मीता मेहेर
(२८-०३-२०२०)





Sunday, March 22, 2020

कविता आणि मी

ती माझं अंतरंग
ती मला सुचते कि तिच्यात मी उलगडत जाते ?
अतूट नातं आहे तिच्याशी ...शब्दांपलीकडचं

तिने सावरलं मला
एक लय दिली
व्यक्त व्हायची संधी दिली
आरश्यातसुद्धा न दिसणाऱ्या मला दाखवल

तिच्या सोबतीने खूप रंग पहिले
भावनांच्या पावसात मनसोक्त न्हायले
कधी रीती झाले , कधी ओथंबून वाहिले

ती माझं अंतरंग ....

--मीता मेहेर.
(21-03-2020)

Wednesday, January 22, 2020

आठवणी


१० - १५ वर्षानंतर तो पुन्हा दिसला ,आणि मी थबकले , गोंधळले
आणि त्याच्या खुणा त्याच्यातच शोधत राहिले.

नाव विचारून खात्री करावी असं म्हणत असतानाच त्याच्या कडे मी पाठ फिरवली
पण मन ... मन पार शाळेत जाऊन पोचलं

मंतरलेल वय आणि अल्लड पोरकटपणा
किती ... किती सुंदर होत्या त्या जाणिवा

डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच बघायचं आणि मैत्रिणीनि खदखदत हसायचं
त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलं कि हृदय पार बाहेर येऊन धडकायच

माझ्या मनातली खळबळ , त्याला कधी दिसली असेल का ?
कधी एक क्षण  का होईना , त्याने मला फिरून पाहिलं असेल का ?

दिवस गेले , वर्ष सरली , आयुष्य पुढे सरकत राहील ,
आठवणी झाल्या होत्या हद्दपार आणि प्रश्न अजूनही होते अनुत्तरित

------------------------------------------------------------------------------------------------------------

पल दो पल का साथ और कुछ अनकही बातें।
कभी हलकी सी हिचकी और बहोत सारी यादें।

-- मीता मेहेर
११-०१-२०२०






ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...