Saturday, March 28, 2020

जातील ...हे ही दिवस जातील

आज खिडकीवर कावळा ओरडला
मी हसले,
कोण येणार माझ्याकडे ?

      काल परावा पर्यंत ओसंडून वाहणारे रस्ते झालेत ओसाड
     आणि गल्लीत निरव शांतता .
     सगळे आवाज स्पष्ट ऐकू येतात आताशा
     आतले .... बाहेरचे

      कैद झालोय स्वतःच्याच घरात ,
      सुखाची बदलली व्याख्या  
      गरजा झाल्यात कमी आणि 
      प्रखर झाल्यात जाणीवा

जातील हे ही दिवस जातील
परत ओरडेल कावळा खिडकीवर
आणि मी .. मी पुन्हा हसेन.

-- मीता मेहेर
(२८-०३-२०२०)





Sunday, March 22, 2020

कविता आणि मी

ती माझं अंतरंग
ती मला सुचते कि तिच्यात मी उलगडत जाते ?
अतूट नातं आहे तिच्याशी ...शब्दांपलीकडचं

तिने सावरलं मला
एक लय दिली
व्यक्त व्हायची संधी दिली
आरश्यातसुद्धा न दिसणाऱ्या मला दाखवल

तिच्या सोबतीने खूप रंग पहिले
भावनांच्या पावसात मनसोक्त न्हायले
कधी रीती झाले , कधी ओथंबून वाहिले

ती माझं अंतरंग ....

--मीता मेहेर.
(21-03-2020)

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...