Thursday, March 8, 2018

जागतिक महिला दिन



आज व्हाट्सअँप वर messages चा पाऊस पडला.  त्यातले मोजकेच मनाला भावतात. 
नेहमीचाच झालय हे आजकाल ,
fwd , fwd च्या खेळात किती गोष्टी आपण का करतो हेच कळत नाही.  

आजच्या दिवशी बाईला वेगळच वलय चढतं. 
काय सिलेब्रेट करतो आपण ? स्त्री च अस्तीत्व ? कशासाठी?
समानतेचा उदो उदो करताना , हि  partiality हवी कशाला ?
सवय झाली आहे आपल्याला कुणालातरी एका सर्वोच्य स्थानावर नेऊन बसवायची , आणि मग त्यापुढे सगळी ढोंग करायची. 

कुठे जातो हा फुकटचा आपलेपणा जेव्हा तिच्या जन्माआधीच तीच जगात येणं मुश्किल झालेलं असत ?
तिच्या असण्यावर , तिच्या दिसण्यावर , सगळ्यावरच , नको असलेले expert कंमेंट्स करून तिला गुदमरून टाकलेलं असत . 
बाईच्या जातीला हे शोभत नाहि हे जेव्हा एक बाईचं बोलते तिथेच ह्या so called महिला दिनाची चकाकी निघून जाते 
दुसऱ्यांनी डोक्यावर बसवल्यावर अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल्याच्या हर्षोल्लासात , आपण बायकाच हे का विसरतो की महत्व आधी आपण स्वतःच स्वतःला द्यायला हवं आणि त्या साठी कुठल्या एका दिवसाची वाट पाहायची गरज नसते . हा प्रवास रोजचा आहे.   

मीता मेहेर 
०८-०३-२०१८

No comments:

Post a Comment

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...