Wednesday, March 27, 2019

समांतर


एकत्र चालता चालता,
वाटा कधी समांतर झाल्या कळलंच नाही .

दुरूनच पाहत राहिलो एकमेकांकडे ,
अंतर कधी कसं वाढलं कळलंच नाही.

येऊ का कधी एकत्र , भूमितीला छेद देऊन ?
समांतर रेघांचं,  समीकरण बदलून .

(२०-१०-२०१८)
--- मीता मेहेर.

No comments:

Post a Comment

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...