आज खिडकीवर कावळा ओरडला
मी हसले,
कोण येणार माझ्याकडे ?
काल परावा पर्यंत ओसंडून वाहणारे रस्ते झालेत ओसाड
आणि गल्लीत निरव शांतता .
सगळे आवाज स्पष्ट ऐकू येतात आताशा
आतले .... बाहेरचे
जातील हे ही दिवस जातील
परत ओरडेल कावळा खिडकीवर
आणि मी .. मी पुन्हा हसेन.
-- मीता मेहेर
(२८-०३-२०२०)
मी हसले,
कोण येणार माझ्याकडे ?
काल परावा पर्यंत ओसंडून वाहणारे रस्ते झालेत ओसाडआणि गल्लीत निरव शांतता .
सगळे आवाज स्पष्ट ऐकू येतात आताशा
आतले .... बाहेरचे
कैद झालोय स्वतःच्याच घरात ,
सुखाची बदलली व्याख्या
गरजा झाल्यात कमी आणि
प्रखर झाल्यात जाणीवा
जातील हे ही दिवस जातील
परत ओरडेल कावळा खिडकीवर
आणि मी .. मी पुन्हा हसेन.
-- मीता मेहेर
(२८-०३-२०२०)
No comments:
Post a Comment