Friday, October 9, 2020

पत्र


आज मित्राचा व्हाट्सअँप  message पहिला . आणि मी विचार करत राहिले कि शेवटचं पत्र कधी आणि कुणाला पाठवलं होत. अजूनही आठवत नाही .  पत्र राहूदे , पर्सनल ई-मेल सुद्धा केलं नाही कित्येक वर्षात. 

भावना emoji ने व्यक्त होतात आणि पत्र अभ्यासक्रमातच राहील . 

मी सिंगापुर ला असताना emails असून सुद्धा मिलिंदला पत्र लिहायचा अट्टाहास केला . तो सुध्दा उत्तर पत्राने द्यायचा . माझ्या वेडेपणात तो जबरदस्तीने ओढला गेला. पण त्या पत्राची वाट बघण्यात काही दिवस निघून जायचे . फोन वर हि बोलायचो , पण पत्राची मजा, आतुरता, त्यातलं अक्षर , सगळं फक्त माझ्या साठी होती ...एकदम exclusive . 

आताशा इन्स्टंट messaging ने पटकन कुणाशीही बोलता येत , लिहिता येत ... जग जवळ आलय म्हणतात खर , पण संभाषण हरवलं आहे. ओलावा हरवला . आततायी पणे अर्थाचे अनर्थ ज्यास्त होताना दिसतात. 

असो 

मी शाळेत असताना माझ्या बहिणी , मैत्रिणी , अनेकाना पत्र लिहिली , त्यांची उत्तर पण यायची . तो खजिना अजून माझ्या कडे आहे. माझा अमूल्य खजिना :-)  

माझी मुलगी ई-मेल का होईना लिहिते , तिच्या दूर सात समुद्र पलीकडे बसलेल्या काकाला .
अजून किती काळ लिहिलं माहित नाही . पण मला त्यातही आनंद आहे. 

आज हा message पाहिल्यावर उगाच जून गाणं आठवलं 

चिठ्ठी आयी है , आयी है , चिठ्ठी आयी है.... 

--मीता मेहेर 
(०९-१०-२०२०)


4 comments:

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...