वर्ष कशी सरली ? आत्ता आत्ताच तर तुझा हात सोडून
मी पुढेपुढे पळत होतो ,
अडखळलो , ठेचाळलो ,
थोडं दूर जाऊन तू पाठी आहेस ना ..ह्याची खात्री करत होतॊ
आज मात्र
पावलांची गती थोडी धीमी झालीय
हाताची पकड जरा घट्ट झालीय
माझ्या बडबडीत तुझे हुंकार वाढलेत
तुझ्या डोळ्यात अनुत्तरित प्रश्न वाढलेत
आयुष्याच्या या टप्प्यात बहुदा आपल्या भूमिका बदलल्यात
त्याच रस्त्यावर पुन्हा चालताना,
मी प्रयत्न करतोय तुझ्याबरोबर स्वतःला सावरायचा
—मीता मेहेर
(20-03-2025)

Beautiful...very well expressed
ReplyDeleteThank you Neha :-)
Delete