चार भिंतींच , अगदी सुरु होऊन संपलेलं ,
पण तरीही आठवणींनी भरलेलं .
घरात टाकलेलं पाहिलं पाऊल , पहिला दिवाळ सण ,
मनात साठवलेत असे कितीतरी क्षण .
नवी सुरुवात , नवी स्वप्न , नव्याने केलेली आपली धडपड .
कधी हसु कधी आसू , कधी चिमुकलीची दुडदुड .
सगळ्यातच होत सोबत, आपलं छोटस घर.
आपल्या सुखदुःखाचा त्यानेही जगाला प्रत्येक कण
कधी आपण घराला सजवलं , कधी त्याने आपल्याला सावरलं.
चार भिंतींच , अगदी सुरु होऊन संपलेलं ,आपलं घर
-- मीता मेहेर
(२४-०६-२०१७)

No comments:
Post a Comment