मनाचे कोनाडे साफ करताना
अचानक चुरगळलेला कागद समोर आला
उघडून बघितल्यावर , आठवणींचा flashback सुरु झाला .
ते वहीतलं दुसरं तिसरं पण असेल .
कोऱ्या वहीचा तो वास , अचानक श्वासात भरून आला.
कागदावरची लिखावट पुसत झाली होती .
पण संदर्भ अजूनही ठळक होता .
रटाळवाण्या lecture मध्ये , सर्वांची नजर चुकवून ,
कुणाकडे टक लावून पाहत होते, ते आठवलं..
नजर मिळाल्यावरच हसू , ना तेव्हा लपवू शकले ना आत्ता .
आणि हसण्याचं कारण ना तेव्हा देऊ शकले ना आत्ता .
-- मीता मेहेर.
(२०१३)

No comments:
Post a Comment