Thursday, July 27, 2023

चौकट

 चारचौघात कुणी तरी एक असावं ,

ज्याने चौकटीच्या बाहेर पडून जगावं.

 

शहाण्यांच्या जगात थोडस वेड पांघराव ,

आणि आपल्याच लयीत काहीस गुणगुणावं .


घ्यावा मोकळा श्वास , मारावी उंच भरारी ,

ठेवावी बाजूला ती, रोजचीच मारामारी .


लोकांच्या नजरा बरंच बोलून जातील ,

नकळत ..आत खोल ..एक प्रश्नचिन्ह सोडून देतील .


पण घाबरायचं नाही भिडू ,

पडू , रडू , पार गळपटून जाऊ ,

पण चौकटीच्या बाहेरच नवीन जग.. शोधात राहू.


-- मीता मेहेर.
२७-०७-२०२३

No comments:

Post a Comment

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...