तो आधी येतो , आणि नेहमी प्रमाणे ही वेळ घेते.
तो आधी रिमझिमतो , कधी रेंगाळतो आणि अगदीच असह्य झाल्यावर धो धो बरसतो.
तीच गणित ठरलेलं असत.
ती त्याच असण अजमावते. आणि खात्री पटली की हळूच डोकावते.
मग कळत नकळत तिचा बहर टिपेला पोहोचतो.
पुन्हा पुढल्या वर्षीच्या वचनाची.
...... दरवर्षी तो येतो ,दरवर्षी ती ही येते.
--मीता मेहेर
(२७-०७-२०२५)
No comments:
Post a Comment