तीच मी अन तीच सकाळ ,
पुन्हा पुन्हा जगते मी ,
आयुष्याचे नवनवीन अर्थ शोधते मी.
कधी प्रश्न , कधी उत्तर , कधी निरव शांतता,
वादळात भरकटूनही , परत उभी राहते मी.
ओळखीच्याच वाटेवर कितीदा हरवते ,
अन प्रत्येक वेळेस माझीच मला उलगडत जाते मी .
तीच मी आणि तीच सकाळ ,
पुन्हा नव्याने जगते मी .
आयुष्याचे नवनवीन अर्थ शोधते मी.
मीता मेहेर
(२२-०८-२०१७)

Superb!
ReplyDeleteQuite relatable..
Thank you Neha.
Delete